कोरोना रुग्णसंख्येत वेगाने वाढ; मागील 5 दिवसात जिल्ह्यात सापडले 80 हून अधिक रुग्ण

0

रत्नागिरी : कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना मागील चोवीस तासांत रत्नागिरी जिल्ह्यात अल्पप्रमाणात कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये नऊ रुग्ण सापडले आहेत. मागील पाच दिवसांत जिल्ह्यातील रुग्ण संख्या वेगाने वाढली असून सध्या १०६ अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

जिल्हयात मागील २४ तासांत अवघ्या २४७ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ९जण बाधित सापडले आहेत तर २३८जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान, मागील पाच दिवसात जिल्ह्यात ८० हून अधिक रुग्ण सापडले असून जिल्हयात मागील पावणेदोन वर्षात तब्बल ७९ हजार २५६ रुग्ण सापडले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:12 PM 04-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here