वेत्ये समुद्रकिनारी आढळली ऑलिव्ह रिडलेची 61 अंडी

0

देवरुख : लांबलेला पाऊस, प्रतिकूल हवामान यामुळे ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे दरवर्षीप्रमाणे यावर्षी अंडी घालण्यासाठी देवरुख तालुक्याच्या सागरी किनारपट्टीवर येणार का? याची साऱ्यांना उत्सुकता लागलेली असताना वेत्ये येथे समुद्रकिनारी कासवाची 61 अंडी आढळून आली.

समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारताना कासवमित्र गोकुळ जाधव यांना ही अंडी आढळून आली असून त्यांनी वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली किनाऱ्यावर घरटे करून योग्यपद्धतीने त्यांचे संवर्धन केले आहे. गेल्या काही वषार्पासून तालुक्याच्या पश्चिम सागरी किनारपट्टीवरील भागामध्ये ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाची अंडी सापडत आहेत.

मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये पर्यावरणामध्ये झालेल्या प्रतिकूल बदलांचा परिणाम झाल्याने सागरी किनारपट्टीच्या वाळूमध्ये अंडी घालण्यासाठी येणाऱ्या ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांचे आगमन यावर्षी लांबणीवर पडणार की काय, याबाबत उत्सुकता लागून राहीली होती. मात्र, या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये दरवर्षीप्रमाणे कासवे अंडी घालण्यासाठी वेत्ये किनारपट्टीवर आली आहेत.

वेत्ये समुद्र किनारी पहाटेच्या दरम्यान फेरफटका मारत असताना कासवमित्र जाधव यांना कासवांची अंडी आढळून आली. त्यांनी याबाबत तात्काळ राजापूर वनविभागाचे वनपाल सदानंद घाटगे, सागर गोसावी आदींशी संपर्क साधून त्याबाबतची माहिती दिली. त्यानंतर किनाऱ्यावरील वन्य प्राणी वा जंगली श्वापदापासून त्या अंड्याचे संरक्षण करण्याच्यादृष्टीने वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली अंड्यांचे सुरक्षित ठिकाणी संवर्धन करून ठेवण्यात आले आहे. वेत्ये येथे जाधव यांनी कासवांच्या अंड्यांच्या सुरक्षिततेसाठी तयार केलेले घरटे यावर्षीचे पहिले घरटे ठरले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:20 PM 04-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here