सत्तार यांना युतीवर बोलण्याचा अधिकार नाही; शिवसेना नेत्यानेच घेतला समाचार

0

औरंगाबाद : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पुढाकार घेतल्यास शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा एकदा युती होऊ शकते, असं विधान ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी केलं होतं. त्यांच्या याच विधानाला आता शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी उत्तर देत अब्दुल सत्तार यांचा समाचार घेतला आहे.

एका वृत्तवाहिनाला बोलतांना खैरे म्हणाले की, ‘अब्दुल सत्तार यांना युतीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. युतीबद्दल उद्धव ठाकरे आणि मुख्य सचिव संजय राऊत बोलू शकतात. रावसाहेब दानवे आणि सत्तार यांचे चांगले संबंध आहेत. मोदी आणि उद्धव ठाकरे हेच युतीबद्दल सांगू शकतात. त्यामुळे मंत्री असताना असं वक्तव्य करणं चुकीचं आहे, असे म्हणत खैरे यांनी सत्तार यांच्यावर निशाणा साधला.

सत्तार हे जरी आज शिवसेनेत आले असले तरीही अब्दुल सत्तार आणि चंद्रकांत खैरे यांचा वाद हा जुनाच आहे. अब्दुल सत्तार काँग्रेसमध्ये असताना खैरे आणि सत्तार हे दोघेही नेते एकमेकांवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नव्हते. त्यानंतर सत्तार शिवसेनेत आले पण त्यांच्यातील वाद मात्र कायम आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:46 PM 05-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here