रत्नागिरी : तालुक्यातील वाटद ते खंडाळा जाणाऱ्या रस्त्यावर कोरोना काळात तोंडाला मास्क न लावल्याप्रकरणी एकाविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार ३ जानेवारी रोजी सायंकाळी ४.१० वा.करण्यात आली.
मासुम सिध्दीक खान (३०, रा. वाटद फाटा, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिस हवालदार धातकर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार कोरोना काळात तोंडाला मास्क न लावता हयगयीचे कृत्य केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जयगड पोलिस करत आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:05 PM 05-Jan-22