रत्नागिरीमध्ये शिवभोजन थाळीला वाढती मागणी

0

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या रत्नागिरीमध्ये शिवभोजनाची लज्जत वाढत चालली आहे. शिवभोजन थाळीची वाढती मागणी लक्षात घेऊन शासनाने रेल्वे स्थानक केंद्रावर आणखी 50, तर मंगला हॉटेल येथील केंद्रावर दुप्पट म्हणजे 100 थाळ्या वाढवुन दिल्या आहेत. आणखी चार केंद्रही जिल्हा पुरवठा विभागाने प्रस्तावित केली आहेत. जिल्ह्यामध्ये 26 जानेवारीच्या मुहुर्तावर शिवभोजनाचा प्रारंभ करण्यात आला. त्यानुसार, प्रत्येक केंद्राला सुरवातील 100 थाळ्यांची मर्यादा दिली होती. मात्र रेल्वे स्थानक आणि मंगला हॉटेल येथील केंद्राला चांगला प्रतिसात मिळत असल्याने जिल्हा पुरवठा अधिकारी महेश पाटील यांनी रेल्वे स्थानकातील केंद्रासाठी जादा 50 तर मंगला हॉटेल येथील केंद्रासाठी 100 थाळ्यांचा प्रस्तावाला तत्काळ मंजूर देण्यात आली. दर्जा आणि सेवा चांगली असल्यामुळे तत्काळ याला मंजूर देण्यात आली. त्यानुसार आता रेेल्वे स्थानकात 150 थाळी तर मंगला हॉटेलमध्ये 200 शिवभोजन थाळी मिळणार आहे. जिल्हा रुग्णालयात मात्र अपेक्षित प्रतिसात मिळत नाही. 100 पैकी जेमतेम 70 ते 80 थाळी जाते. त्यामुळे या केंद्राचा प्रसार व्हावा, यासाठी फलक लावण्याच्या पुरवठा विभागाने सुचना केल्या आहेत. रत्नागिरीत जिल्हा न्यायालय, गाडीतळ, मारुती मंदीर आणि साळवी स्टॉप अशी आणखी चार केंद्र मंजूर व्हावी, असा प्रस्ताव पुरवठा विभागाने शासनाला दिला आहे. रत्नागिरी मुख्यालयात 1200 थाळीचे उद्दीष्ट पुरवठा विभाचे आहे, असे पुरवठा अधिकारी महेश पाटील यांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here