नागरिकांना भटक्या श्वानांपासून होणारा उपद्रव लक्षात घेऊन रत्नागिरी नगरपालिकेने श्वानांच्या निर्बीजीकरणाची व लसीकरणाची मोहीम जोरात सुरु केली आहे. यामुळे भविष्यात भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे. कायद्यानुसार श्वानांना मारता येत नसल्याने हि मोहीम राबवण्यात येत आहे. सोसायटी फॉर अॅिनमल प्रोटेक्शन कोल्हापूर आणि नगरपालिका रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने हि मोहीम राबवण्यात आली आहे. नागरिकांना होणारा उपद्रव लक्षात घेऊन आत्मीयतेने काम करणारे नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांचे अनेक नागरिक या मोहिमेबद्दल आभार मानत आहेत.



