मुंबई : देशभर कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. महाराष्ट्रात तर कोरोनाने कहर केला आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याने इंडस्ट्रीचं टेन्शन वाढलं आहे. आता मराठी चित्रपटसृष्टीतही कोरोना दाखल झाला आहे.
मराठमोळा अभिनेता अंकुश चौधरी याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. अंकुशने खुद्द सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली.
‘नमस्कार, माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू आहेत आणि तुमचे आशिर्वाद आहेच. कोरोना वर मात करून पुन्हा त्याच जोशात आणि त्याच जोमात पुन्हा तुमच्यासमोर येईन. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास चाचणी करून घ्यावी,’ असं ट्विट अंकुशने केलं आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:28 PM 05-Jan-22