जिल्ह्यातील आदर्श शाळा पुरस्कारांचे आज वितरण

0

रत्नागिरी : जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गंत ग्रामीण भागातील आदर्श जिल्हा परिषद शाळा पुरस्कारांसाठी कनिष्ठ व वरिष्ठ गटस्तरावर प्रत्येकी 9 व विशेष पुरस्कारासाठी एका कनिष्ठ व एका वरिष्ठ अशा एकूण 20 प्राथमिक शाळांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे वितरण आज 6 जानेवारी 2022 रोजी दुपारी 12.00 वाजता लोकनेते स्व. शामरावजी पेजे सांस्कृतिक भवन तळ मजला, जिल्हा परिषद रत्नागिरी येथे संपन्न होणार आहे. 

आदर्श शाळा पुरस्कारासाठी 2021-22 मध्ये जिल्हाभरातून 16 कनिष्ठ पाथमिक तर 17 वरिष्ठ प्राथमिक शाळांचे आले होते. त्यामध्ये कनिष्ठ व वरिष्ठ गटातूनही पत्येक तालुक्यातून 1 शाळेची निवड जिल्हा पातळीवरील निवड करण्यात आली आहे. तर विशेष पुरस्कारासाठी कनिष्ठ गटात लांजातील 1 तर वरिष्ठ गटात राजापूरातील एक अशा दोन शाळांची निवड झाली आहे.        

प्राथमिक शाळांतील दाखल मुलांची टक्केवारी, उपस्थितीचे प्रमाण, शाळा सिध्दी श्रेणी, सा.फु.द.पा.योजना, शैक्षणिक मार्गदर्शन, शासनाच्या विविध योजना, शैक्षणिक उठाव, शाळेतील उपकम, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यकम अंमलबजावणी या निकषांनुसार शाळांची निवड करण्यात आली.

आज 6 जानेवारी 2022 रोजी दुपारी 12.00 वाजता या पुरस्कारांचे वितरण स्व. शामरावजी पेजे सांस्कृतिक भवन तळ मजला, जिल्हा परिषद रत्नागिरी येथे संपन्न होणार आहे, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, रत्नागिरी यांनी कळविले आहे. या कार्यकमासाठी जि.प.अध्यक्ष विकांत जाधव, सीईओ डॉ. इंदुराणी जाखड, उपाध्यक्ष उदय बने, अतिरिक्त सीईओ परिक्षित यादव, समाजकल्याण सभापती परशुराम कदम, महिला व बालकल्याण सभापती भारती सरवणकर, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती रेश्मा झगडे, डाएटचे प्राचार्य डॉ. गजानन पाटील तसेच शिक्षण व अर्थ समिती सभापती चंद्रकांत मणचेकर, शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे आदींची उपस्थिती लाभणार आहे.  

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:01 AM 06-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here