शिर्के प्रशालेत सायबर सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन

0

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीची शिर्के प्रशाला येथे जिजाऊ ते सावित्री ‘सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ या अभियानाला सुरुवात केली. सुरुवातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षितता आणि जागृती या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी श्री. महाले, श्री. कांबळे, श्री. पाटील, पोलिस कॉन्स्टेबल नाडणकर, कांबळे तसेच पोलिस नाईक जाधव हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षितता आणि जागृती या विषयावर मार्गदर्शन केले. यामध्ये किशोरवयीन मुले अपूर्ण माहितीमुळे सायबर गुन्ह्यांत कशी अडकतात, याचे माहिती दिली. मुख्याध्यापिका गायत्री गुळवणी यांनी प्रास्ताविक केले. प्रियांका नाखरेकर यांनी सूत्रसंचालन केले, तर समीर पडवेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी सांस्कृतिक विभागातर्फे रोहित भारदे यांनी काम पाहिले. या वेळी उपमुख्याध्यापक रमेश चव्हाण, पर्यवेक्षक कुमारमंगल कांबळे व सर्व शिक्षक उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:01 AM 06-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here