सिव्हीलमधील अर्भक अदलाबदल प्रकरण: अखेर दहा दिवसांनी मिळाला दोन्ही मातांना आपापल्या अर्भकांसह डिस्चार्ज

0


शासकीय रूग्णालयात अर्भक अदलाबदल पकरणाला परिचारिकाच जबाबदार असल्याची माहिती समोर आली, आता दोन्ही मातांकडे त्यांचे त्यांचे मुल देण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यानी स्पष्ट केली आहे. तरीदेखील याची वस्तुस्थिती समोर यावी यासाठी डिएनए करण्यात आले आहेत. याचे रिपोर्ट येण्यास विलंब लागणार असल्याने अखेर पालकांच्या विनंतीनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. शनिवारी सिव्हीलमधील परिचारिकेने आधी मुलगा झाला सांगितले आणि नंतर मुलगा नाही तर मुलगी झाल्याचे संबंधित पालकांना सांगितले. या पकाराने दोन्ही कुटुंबिय तणावाखाली आहेत तर दुसरीकडे डोळ्यांच्या पापण्या उघडण्याच्या आधीच या दोन दिवसाच्या तान्हुल्यांची डिएनए करण्यात आले. हे डिएनए पुणे लŸबला पाठवण्यात आल्याने अजून काही दिवस रिपोर्टसाठी लागणार आहे. ही बाब लक्षात घेवून संबंधित दोन्ही अर्भकाच्या पालकांनी अजून किती दिवस रूग्णालयात राहायचे यामुळे आपली सगळी कामे अडकून राहिली आहेत. आम्हाला डिस्चार्ज द्यावा डिएनएचे जे काही रिपोर्ट येतील ते आम्हाला मान्य असतील. त्यामुळे तुर्तास आम्हाला घरी जाण्याची परवानगी मिळावी म्हणून जिल्हा शल्यचिकित्सकांकडे विनंती केली होती त्यानुसार कायदेशीर प्रकिया करून या दोन्ही मातांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्ज दिल्यानंतर कोणताही अनुचित पकार घडू नये यासाठी सिव्हील पशासनाकडून दहा दिवस झाल्यानंतर शासकीय रूग्णालयात शनिवारी अर्भक अदलाबदल पकरण घडल्याची तकार प्रशासनाकडे आली. संबधीत परिचारीके मुलगा झाल्याचे पालकांना सांगितले, मात्र काही वेळातच आपल्याला मुलगा नाही मुलगी झाली आहे, असे तिच्याकडून सांगण्यात आले. त्याचबरोबर रूग्ण पत्रिकेमध्ये मुलगा ऐवजी मुलगी अशी खाडाखोड केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. त्यामुळे संबंधित दोन्ही अर्भकांच्या मातांना डिस्चार्ज देण्यात आला नव्हता अखेर या दोन्ही पालकांनी डिस्चार्ज देण्याची विनंती केल्याने यासंदर्भात कायदेशीर प्रकिया करून त्यांना सोमवारी सायंकाळी डिस्चार्ज देण्यात आले आहे.डिएनए रिपोर्ट आल्यानंतर या दोन्ही पालकांना बोलावून घेण्यात येणार आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत रूग्णालय प्रशासनाने तातडीने चार सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली. या समितीने बुधवारी संबंधित पकरणात हलगर्जीपणा करणाऱयांची चौकशी केली आहे. याबाबतचा अहवाल या एक-दोन दिवसात तयार होणार आहे. मात्र, डिएनए रिपार्टनंतरच याबाबतची सत्यता स्पष्ट होणार आहे. दोन्ही अर्भकाचे डिएनए सŸम्पल रिपोर्टसाठी मंगळवारी पुण्याला पाठविण्यात आले आहे. याबाबतचा अहवाल मिळण्यास काही दिवसांचा कालावधी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here