शेकोटी घेत असताना भाजून महिलेचा मृत्यू

0

चिपळूण : तालुक्यातील शिरगाव येथे राहणाऱ्या उज्ज्वला उदय देवळेकर (४०) यांचा भाजून मृत्यू झाला आहे. दि. २७ डिसेंबर रोजी हा प्रकार घडला. सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असताना दि. ४ जानेवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.

उज्ज्वला देवळेकर या दि. २२ डिसेंबर रोजी सकाळी ७:३० वाजण्याच्या समारास शेकोटी पेटवून शेकत असताना त्यांच्या गाऊनने अचानक पेट घेतला. यामध्ये त्या ८० टक्के भाजल्या. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारार्थ त्यांना सांगली येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:10 PM 06-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here