कोरोना काळात समाज जनजागृती करण्यात पत्रकारांचे योगदान फार मोलाचे; पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांचे प्रतिपादन

0

◼️ मराठी पत्रकार परिषद मार्फत पोलीस-पत्रकार संवाद संपन्न

रत्नागिरी : कोरोना काळात जसे प्रशासकीय यंत्रणेने काम केले, त्याबरोबर पत्रकारांनी केलेले काम सर्वात महत्वाचे ठरले, पत्रकारांमुळेच अनेक चांगल्या गोष्टी समाजासमोर पोहचल्या. त्यामुळे या बहुमोल कार्याचे करावे तेवढे कमी आहे, पोलिसांचे नेहमीच पत्रकारांना सहकार्य राहील असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉ मोहितकुमार गर्ग यांनी केले.

मराठी पत्रकार परिषद रत्नागिरी तालुका च्यावतीने पत्रकार दिनानिमित्त पोलीस पत्रकार संवाद व सन्मान योद्धांचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक डॉ मोहितकुमार गर्ग उपस्थित होते.

तसेच पत्रकार परिषद राज्य प्रतिनिधी जान्हवी पाटील, जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण देवरुखकर, कार्याध्यक्ष राजेश शेळके, तालुकाध्यक्ष आनंद तापेकर, भालचंद्र नाचणकर, सचिव जमीर खलफे, मुश्ताक खान, उपाध्यक्ष सतीश पालकर, प्रशांत पवार, प्रणव पोळेकर, अमोल मोरे, केतन पिलणकर, शुभम राऊत, अजय सावंत, समीर शिगवण, दिपक कुळेकर, श्रीहरी तांबट, संजय पंडित, संदेश पवार यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रदीप साळवी, राजेश मयेकर आदी उपस्थित होते.

समाज सुधारणा असेल वा जनजागृती यामध्ये पत्रकारांचे योगदान फार महत्वपूर्ण आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही आपल्या देशातील मीडिया खूप सकारात्मक आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकारांचे सांगायचे झाले तर कोरोना काळात त्यांनी केलेली कामगिरी पोलिसांप्रमाणेच असल्याचा उल्लेख पोलीस अधीक्षक डॉ मोहितकुमार गर्ग यांनी केला. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावं यासाठी पोलीस खाकी गणवेशचा दरारा जसा महत्वपूर्ण आहे त्याप्रमाणे पत्रकारांची लेखणी आहे. आज अनेक घटना उघडकीस आणण्यात पत्रकारांचाही मोलाचा वाटा आहे, समाजात अनेक गुन्हे उघडकीस आणताना पोलीसांनी माहिती दिल्याशिवाय पत्रकार वृत्त प्रसिद्ध करत नाही, कारण न सांगता किंवा वस्तुस्थिती माहिती नसताना वृत्त देणे चुकीचे ठरते, मात्र पोलिसांनी माहिती दिल्यावरच पत्रकार ते वृत्त प्रसिध्द करतात ही भूमिका पोलीस आणि पत्रकार यांच्यातील महत्वपूर्ण दुवा ठरते.

यावेळी मोहितकुमार गर्ग यांनी जिल्हा पोलीस दलाचा चित्रफीत द्वारे सादरीकरण केले. या कार्यक्रमाची प्रस्तावना श्रीकृष्ण देवरुखकर, आभारप्रदर्शन प्रशांत पवार तर निवेदन जान्हवी पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन आणि दीपप्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आले.

यावेळी कोरोना काळात कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांचे मृतदेह कोणी स्वीकारत नव्हते अशा परिस्थितीत जिल्हा शासकीय रुग्णालय व नगर परिषदेचे कर्मचारी या मृतदेहावर अत्यंसंस्कार करत होते, २ वर्षे त्यांनी जीवाची पर्वा न करता हे काम केले यामध्ये नगर परिषदचे शुभ्यकर विचारे, सुनील माटल, नितीन राठोड, योगेंद्र जाधव, प्रसाद जाधव, संजय मकवाना, हरीश जाधव, रोहीत आठवले, संतोष राठोड आदी तर जिल्हा शासकीय रुग्णालयातील रोहन सावंत, दर्शन देसाई, अजय मकवाना, विकास नाणीजकर, निखिल शिवलकर, परेश मयेकर यांचा स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:38 PM 06-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here