संगमेश्वर पंचायत समितीचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

0

देवरुख : देवरूख माटे भोजने सभागृह येथे संगमेश्वर पंचायत समितीच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची सांस्कृतिक कार्यक्रमाने गुरुवार दिनांक ६ जानेवारी रोजी सांगता झाली. एकापेक्षा एक सरस कार्यक्रम सादर करत हे संमेलन यादगार करण्यात आले.

संगमेश्वर पंचायत समिती अधिकारी, पदाधिकारी आणि कर्मचारी वृंद यांच्या कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे ४ ते ६ जानेवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध कबड्डी, क्रिकेट, हॉलीबॉल, रस्सीखेच , बॅडमिंटन, कॅरम, रांगोळी स्पर्धा, धावणे तसेच पाककला स्पर्धा देखील घेण्यात आली. या स्पर्धांना अधिकारी, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.

शासनाच्या नियमांचे पालन करून हे कार्यक्रम घेण्यात आले. गुरुवारी सकाळी माटे भोजने सभागृह येथे सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रारंभ झाला. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, सभापती जया माने, उपसभापती परशुराम वेले, गटविकास अधिकारी नरेंद्र रेवडकर यांसह सर्व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्यक्रमाने या महोत्सवाची गुरुवारी सांगता झाली. कार्यक्रमांमध्ये जाखडी, नमन, गोंधळ, काव्यवाचन या कार्यक्रमाने रंगत वाढली. सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत हा बहारदार कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रमांतर्गत विविध स्पर्धांमध्ये विजेते, उपविजेत्या संघ यांना आकर्षक बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:08 PM 07-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here