मास्कच्या वापरात देशात मुंबई पहिल्या क्रमांकावर

0

मुंबई : कोरोनाविरोधतल्या लढाईतलं दुसरं सर्वात महत्वाचं शस्त्र म्हणजे मास्क. याच मास्कमुळे कोरोनाचा थेट संसर्ग रोखणं शक्य आहे.

भारतात या मास्कच्या वापरात मुंबई शहराचा प्रथम क्रमांक लागतोय. मुंबईतील 76.28 टक्के लोक हे मास्कचा वापर करतात तर पुण्यातील 33.60 टक्के लोक मास्कचा वापर करतात असं डिजिटल इंडिया फाऊंडेशनच्या एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

डिजिटल इंडिया फाऊंडेशननं देशातील मास्कच्या वापरावर एक सर्वेक्षण केलं आहे. देशातल्या 11 शहरांमध्ये 27 दिवस हे सर्वेक्षण झालं. 23 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर 2021 या कालावधीत 911 जणांच्या मुलाखती झाल्या आणि त्यानंतर 11 शहरांमधल्या मास्क वापरणाऱ्यांची आकडेवारी समोर आली. यामध्यमे मुंबईत सर्वात जास्त लोक मास्कचा वापर करत असून त्याचं प्रमाण हे 76.28 टक्के इतकं आहे. तर अर्धवट मास्क न घातलेल्या लोकांचं प्रमाण हे 17.57 टक्के इतकं आहे. मुंबईत 6.15 टक्के लोक मास्कचा वापर करत नाहीत असं या अहवालातून समोर समोर आलं आहे. मुंबईत गेल्या दोन वर्षांत जवळपास 80 कोटींचा दंड वसूल करण्यात आला.

शहर, मास्क घातलेले, अर्धवट मास्क, मास्क न घातलेले

मुंबई 76.28 % 17.57 % 6.15 %

हैदराबाद 45.75 % 17.10 % 37.13 %

शिमला 40.59 % 19.60 % 39.80 %

कोलकाता 40.55 % 11.20 % 48.15 %

जम्मू 39.13 % 14.40 % 46.20%

चेन्नई 38.90 % 13.10 % 48.00 %

गुवाहाटी 38.83 % 11.55 % 49.65 %

दिल्ली 38.25 % 16.16 % 45.49 %

चंदीगड 36.30 % 11.70 % 52.00 %

पुणे 33.60 % 37.00 % 29.40 %

रायपूर 28.13 % 10.94 % 60.94 %

रुग्ण संख्येत दुसऱ्या स्थानावर असलेली दिल्ली मास्क लावण्याच्या बाबतीत आठव्या स्थानावर आहे तर पुणे दहाव्या स्थानावर आहे.

सध्या देशात रुग्णवाढ सर्वात जास्त वेगानं होतेय. गेल्या 24 तासांमध्ये लाखांहून जास्त नव्या रुग्णांची नोंद झालीय. हाच आकडा पुढच्या काही दिवसांमध्ये आणखी वाढणार आहे. अशा स्थितीत लसीकरणाबरोबरच मास्क लावणे.स हे ही तिकतकंच महत्वाचं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:47 PM 07-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here