नैसर्गिक आरिष्टाला तोंड देण्यासाठी प्रशासनाचा अॅक्शन प्लान

0

रत्नागिरी : पावसाळ्यात येणाऱ्या नैसर्गिक आरिष्टाला तोंड देण्यासाठी भविष्यातील या घटना टाळण्यासाठी आता प्रशासनाने अॅक्शन प्लान तयार केला आहे. यामध्ये भूस्खलन होणारी गावे, किनारी गावे, दुर्गम गावे आणि पूररेषेतील गावे अशी विगतवारी करून आराखडा प्रस्तावित केला आहे.

विविध ठिकाणी एकाच वेळी अनेक भूस्खलन आणि एकाहून अधिक पूर म्हणजे येत्या काळात हवामान बदलाला तोंड देण्यासाठी सज्ज राहा, असा निसर्गाचा स्पष्ट संकेत असू शकतो. त्यामुळे येत्या काळात यावर अधिक बळकट धोरणात्मक उपायांची आवश्यकता आहे हवामान बदलाला तोंड देण्याचा हा निसर्गाचा स्पष्ट संकेत असू शकतो. अनेक ठिकाणी एकाचवेळी अनेक भूस्खलन आणि एकाहून अधिक पूर येत असल्याने हवामान बदलासाठी बळकट धोरणात्मक उपायांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

स्वदेश, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, जगद्गुरू नरेंद्र महाराज संस्थान, रोटरी, लायन्स, जेएसडब्ल्यू फाऊंडेशन, रिलायन्स फाऊंडेशन, टाटा ट्रस्ट, अनमोल फाऊंडेशन, जैन समाज जळगाव, गुरुद्वार पनवेल, वनवासी कल्याण, हिरवळ प्रतिष्ठान यांसारख्या स्वयंसेवी संस्था आणि संस्थांकडून प्रशासनाला प्रचंड मदत मिळाली. अक्षयपात्र फाऊंडेशन, श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, युनिसेफ आणि रेड क्रॉसशी संलग्न अनेक स्वयंसेवी संस्था आहेत. आपत्तीत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांनी भरीव मदत केली. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल अंबरनाथ पालिकांनी खूप मेहनत घेतली. मुंबई पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने विक्रमी वेळेत प्राण्यांची शास्त्रीय विल्हेवाट लावण्यासाठी अहोरात्र काम केले, जखमी प्राण्यांवर उपचार आणि लसीकरण केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:46 PM 07-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here