सावर्डे विद्यालयात वेशभूषा स्पर्धा

0

सावर्डे : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या विषयी विद्यार्थिनींमध्ये सजगता निर्माण व्हावी व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होऊन या थोर व्यक्तिमत्त्वांचे समग्र गणांचे अनुकरण करता यावे या उद्देशाने सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थिनींची वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक अन्वर मोडक, उपमुख्याध्यापक विजय काटे, पर्यवेक्षक उद्धव तोडकर विद्यालयातील सर्व शिक्षिका व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. इयत्ता आठवी व नववी या वर्गातून २८ विद्यार्थिनींनी पी. व्ही. सिंधू, बहिणाबाई चौधरी, रमाबाई आंबेडकर, पी.टी. उषा, शांताबाई शेळके, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, मुक्ताबाई, आनंदीबाई जोशी, येसूबाई, सिंधुताई सपकाळ आदी वेशभूषा साकारल्या होत्या.

यामधून मुक्ताबाई या वेशभूषेसाठी प्रियुषा कुंभार आठवी ब, प्रथम, सीता व कल्पना चावला या वेशभूषेसाठी श्रावणी कानसे व अक्षया होडे द्वितीय, तर जिजाऊ – जागृती ओकटे व येसूबाई-श्रावणी कांबळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. आनंदीबाई जोशी या वेशभूषेसाठी पूर्वा नरोटे या विद्यार्थिनीने उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला. कामथे रुग्णालयाचे सहायक वैद्यकीय अधिकारी दर्शन खोत यांनी विद्यार्थिनींना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. यावेळी आरोग्य तपासणीही करण्यात आली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:00 PM 07-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here