केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना कोरोनाची लागण

0

जालना : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना कोरोनाची लागण झाली आहे. रावसाहेब दानवे यांनी संपर्कात आलेल्या नागरिकांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

रावसाहेब दानवे यांनी सांगितले की, ते 6 जानेवारी रोजी रात्री मुंबई येथून रेल्वेने जालना येथे आले व तेथून भोकरदन येथे आले. मात्र प्रकृती चांगली नसल्याने त्यांनी दुपारी कोरोना चाचणी केली. 7 रोजी रात्री 12 वाजता त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. याचबरोबर, रावसाहेब दानवे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. स्वत: ला आयसोलेशन करुन घेतले असून संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन रावसाहेब दानवे यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:20 AM 08-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here