बेदरकारपणे दुचाकी चालवत पादचारी महिलेस धडक

0

रत्नागिरी : बेदरकारपणे दुचाकी चालवून पादचारी महिलेस धडक देत अपघात केल्याप्रकरणी चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अपघाताची ही घटना बुधवार ५ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वा.उद्यमनगर येथे घडली आहे. हुसैन नाझीम हकिम (२०,रा.धनजी नाका, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात अमोल अनंत अवेरे (३३, रा.उद्यमनगर झाडगाव एमआयडीसी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, बुधवारी सायंकाळी ६ वा. त्यांची आई गिरणीवर दळण टाकून घरी येत होत्या. त्याचवेळी हुसैन हकिम आपल्या ताब्यातील अ‍ॅक्सेस दुचाकी (एमएच-०८-एव्ही-६२५५) घेउन  जात असताना त्याने अमोल अवेरे यांची आई अमिता अवेरे(५७) यांना धडक देत अपघात केला. तसेच अपघात झाल्यावर खबर न देता पळून गेला होता. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलिस फौजदार टेमकर करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:55 AM 08-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here