स्टीफन हॉकिंग यांची आज जयंती

0

जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ प्रा. स्टीफन हॉकिंग यांची आज जयंती. 2018 साली त्यांचं वयाच्या 76 व्या वर्षी निधन झालं.

IMG-20220514-WA0009

बिग बँग थिअरी, कृष्णविवरावरील हॉकिंग यांचं संशोधन भौतिकशास्त्रासाठी मोठं योगदान आहे. त्यांचं हेच योगदान लक्षात घेत गूगलने देखील त्यांच्या 80 व्या जयंती निमित्त खास डुडल साकारले आहे. त्यांच्या जीवनाचा लेखाजोखा गूगलने एका खास व्हिडिओ द्वारा आज डूडल वर प्रदर्शित केला आहे. कम्प्युटर जनरेटेड व्हॉईस देखील त्यामध्ये वापरण्यात आला आहे.

स्टीफन हॉकिंग यांना वयाच्या 21 व्या वर्षी amyotrophic lateral sclerosis (ALS)या Neurodegenerative Disease ने ग्रासले होते. हळूहळू त्यांची हालचाल मंदावली. बोलण्याची क्षमता त्यांनी गमावली. पण 1980 साली MIT engineer Dennis Klatt यांनी तयार केलेल्या कम्प्युटर जनरेटेड व्हॉईस द्वारा त्यांनी संभाषण सुरू ठेवले. आजच्या गूगल डूडलवरही त्यांच्या आवाजाची झलक आपण ऐकू शकतो. यामध्ये ते Black Holes बाबत बोलताना दिसून येतात.

स्टीफन हॉकिंग हे जगभरातील अभ्यासकांचे प्रेरणास्त्रोत होते. हॉकिंग बोलणारं एक एक वाक्य हे प्रेरणादायी विचार म्हणून नोंदलं गेलं.

स्टीफन हॉकिंग यांचे काही महत्वाचे विचार
गमती नसतील तर आयुष्य एक शोकांतिका ठरेल
जरी मी हालचाल करु शकत नसलो, मला बोलण्यासाठी कॉम्प्युटरची मदत घ्यावी लागत असली, तरीही मी माझ्या मनातून मुक्त आहे
नेहमी आकाशातील ताऱ्यांकडे पाहा, आपल्या पायाखाली पाहू नका. जे पाहाल, त्याचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करा. कुतूहल जागरुक ठेवा.
आयुष्य कितीही कठीण असलं तरी, त्यावर तुम्ही मात करु शकताच. तुम्ही यशस्वी व्हाल!
आपल्याला जे जे करता येईल ते सर्व करायला हवं. मात्र जे आपल्या हातात नाहीत, त्याबाबत पश्चाताप करु नये
दिव्यांगांना माझा सल्ला आहे, तुम्ही त्या गोष्टींवर लक्ष द्या, ज्या करण्यापासून तुम्हाला तुमचं अपंगत्व रोखू शकणार नाही, किंवा तुमचं अपंगत्व त्याआड येणार नाही. लक्षात ठेवा आत्म्या आणि शरीर दोन्हीही अपंग होऊ देऊ नका.
आक्रमकता मनुष्याची सर्वात वाईट सवय आहे. आक्रमकता सभ्यतेचा नाश करते.
कधीही करु शकत नाही असं काहीही नाही
जे आपल्या बुद्ध्यांकाबद्दल/ IQ बद्दल दावा करतात, ते अयशस्वी असतात
ब्रह्माण्डापेक्षा मोठं आणि जुनं काहीच नाही

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:09 PM 08-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here