INDvNZ: भारताच्या महिला क्रिकेट संघाची उपांत्य फेरित धडक

0

भारताच्या महिला क्रिकेट संघाने टी-20 वर्ल्ड कपमध्ये विजयाची हॅटट्रीक घेतली आहे. गतविजेत्या ऑस्ट्रेलिया व बांग्लादेशला हरविल्यानंतर हरमनप्रीत कौरच्या भारतीय संघाने न्यूझीलंडचा देखील पराभव केला आहे. न्यूझीलंडचा निसटता पराभव झाला असला तरी टीम इंडिया उपांत्य फेरित दाखल झाली आहे. अशाने या विश्वचषकात उंपात्य फेरित दाखल होणारी टीम इंडिया हा पहिला संघ ठरला आहे. भारताने न्यूझीलंडसमोर 134 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 20 षटकात 129 धावाच बनवू शकला. भारताच्या या विजयात सलामी फलंदाज शेफाली वर्मा हिचा मोठा वाटा आहे. शेफालीने धमाकेदार 46 धावा केल्या त्यासाठी तिला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार देखील मिळाला.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here