उत्तराखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा, ७० जागांसाठी निवडणूक होणार

0

नवी दिल्ली : देशात एकीकडे कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा थैमान घालायला सुरुवात केली असतानाच, दुसरीकडे देशातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, पंजाब आणि गोवा या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची शनिवारी घोषणा करण्यात आली आहे.

येथे एकूण ६९० विधानसभा जागांसाठी निवडणूक होईल. या राज्यांतील निवडणुका भविष्यातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही महत्वाच्या असल्याचे मानले जात आहे. उत्तराखंडमध्ये एकूण ७० जागांसाठी निवडणूक होईल. यासंदर्भात मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चिंद्रा यांनी माहिती दिली.

या ५ राज्यांपैकी पंजाब वगळता ४ राज्यांमध्ये एनडीएचे सरकार आहे. यांपैकी उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ, उत्तराखंडमध्ये पुष्कर सिंह धामी, गोव्यात प्रमोद सावंत, मणिपुरमध्ये नोगथोम्बन बीरेन सिंग आणि पंजाबमध्ये काँग्रेसचे चरणजीत सिंग चन्नी हे मुख्यमंत्री आहेत. या पाच राज्यांत तब्बल १८.३४ कोटी मतदान मतदान करतील.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:25 PM 08-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here