खादी हे वस्त्र म्हणून नव्हे, तर विचार म्हणून वापरा : युयुत्सु आर्ते

0


देवरूख : खादी हे वस्त्र म्हणून नव्हे तर विचार म्हणून वापरा, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांनी केले. देवरूख येथील शासनमान्य विक्री केंद्राच्या उद्घाटनावेळी आर्ते बोलत होते.


यावेळी मिहीर आर्ते, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बाबा सावंत, पंकज पुसाळकर, हनिफ हरचिरकर, राजू वणकुंद्रे, रेवा कदम, अयुब कापडी, मातृमंदिरचे सतीश शिर्के, अविनाश घोलम आदी मान्यवर उपस्थित होते.


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देवरूख शहरात सरकारमान्य प्रमाणित खादी कापड प्रदर्शन व विक्रीला सुरुवात झाली. ग्रामीण रोजगार निर्मितीचे प्रमुख साधन असलेल्या खादी स्टॉलला भेट देण्याचे आवाहन आर्ते यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here