तुरळ येथे रिक्षा संघटनेचे आजपासून उपोषण

0

साडवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई-तुरळ रस्त्याचे निकृष्ट काम तसेच कडवई-चिखली रस्त्याची दुरवस्था याविरोधात रिक्षा मालक-चालक संघटना कडवई-तुरळ चिखलीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. यावर बांधकाम विभागाने कोणतेही पाऊल न उचलल्याने अखेर रिक्षा संघटनेच्या वतीने दि. १० जानेवारी पासून तुरळ येथे आमरण उपोषणास बसण्याचा ठाम निर्धार करण्यात आला आहे.

कडवई ते तुरळ हा रस्ता सन २०२० मध्ये करण्यात आला. याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने हा रस्ता अंदाजपत्रकाप्रमाणे बीबीएम न करता पूर्ण केला होता. तसेच या रस्त्याचे कामही निकृष्ट झाल्याचे रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी सांगितले. काम पूर्ण झाल्यानंतर तीन महिन्यांतच हा रस्ता खराब होण्यास सुरुवात झाल्याने रिक्षा संघटनेच्या वतीने त्याचवेळी बांधकाम विभागास तक्रार देण्यात आली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:26 AM 10-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here