रत्नागिरी जिल्हा परिषदेतर्फे 20 शाळांचा आदर्श शाळा पुरस्काराने सन्मान

0

रत्नागिरी : जिल्हा परिषदेतर्फे दिला जाणारा आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच जि.प.च्या लोकनेते श्यामराव पेजे सभागृहात पार पडला. यावेळी एकूण २० शाळांचा गौरव करण्यात आला.

यावेळी जि.प. अध्यक्ष विक्रांत जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, उपाध्यक्ष उदय बने, शिक्षण व वित्त सभापती चंद्रकांत मणचेकर, समाजकल्याण सभापती परशुराम कदम, महिला व बाल कल्याण सभापती भारती सरवणकर, सभापती रेश्मा झगडे, रत्नागिरी पंचायत समिती सभापती संजना माने, उपसभापती उत्तम सावंत, सदस्या रचना महाडिक, उपशिक्षणाधिकारी सुधाकर मुरकुटे, संदेश कडव, सदस्य व अधिकारी, ग्रामस्थ, शिक्षक मोठ्या संख्येने गास्थित होते.

जि.प. आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त शाळा: कनिष्ठ प्राथमिक शाळा वरिष्ठ प्राथमिक शाळांमध्ये मंडणगड लाटवण उर्दू, अडखळ शाळा, दापोली-देहेण तळवटकरवाडी, कर्दे मराठी शाळा, खेड – शेरवली वरची शाळा, धवडे केंद्र शाळा, चिपळूण कापरे वरची शाळा, निरबाडे नं.१. गुहागर -वाडदई शाळा, वरवेली नं. २, संगमेश्वर-फुणगूस मराठी शाळा, डावखोल केंद्र शाळा, रत्नागिरी टिके कांबळेवाडी नं.३, चांदोर नं. १, लांजा-पडवण नं. १, बापेरे पाथमिक शाळा, राजापूर-शाळा मुर नं. १, पाथर्डे शाळा, विशेष पुरस्कार शाळा, लांजा – लांजा नं.२ आगरगाव व संगमेश्वर
आंबेड बु. नं.२ शाळा यांचा गौरव करण्यात आला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:38 AM 10-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here