कुळवंडी पाणीपुरवठा समिती चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन

0

खेड : तालुक्यातील कुळवंडी ग्रामपंचायतीच्या ग्राम आरोग्य पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या तक्रारीबाबत चौकशीसह कार्यवाहीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. या बाबतचे पत्र गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी उपोषणकर्ते संतोष खोपकर यांना दिले आहे.

कुळवंडी ग्रामपंचायतीच्या ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती यांच्याकडील दप्तर मिळाले नसल्याची तक्रार कुळवंडी येथील संतोष खोपकर यांनी केली होती. तसेच पाखाडीच्या कामकाजाबाबत ही पंचायत समितीकडे तक्रार केली होती. याबाबत कुठलीच माहिती प्राप्त न झाल्याने खोपकर यांनी पंचायत समिती कार्यालय आवारात उपोषण सुरू केले होते. या उपोषणाची दखल घेत चौकशी व कार्यवाहीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आल्याचे पत्र खोपकर यांना देण्यात आले आहे.

या समितीमध्ये बांधकाम उपविभागाचे अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता व ग्रामविस्तार अधिकारी शरद भांड यांची नेमणूक करण्यात आली आहे. याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेशही त्रिसदस्यीय समितीला देण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणी कोणती कारवाई होते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:53 PM 10-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here