पोलिस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल

0

खेड : तालुक्यातील भरणे नाका येथे दि.७ रोजी सायंकाळी ५.३८ वाजता फोनवर बोलत दुचाकी चालवणाऱ्या तरुणाला पोलिस कर्मचाऱ्याने अडवल्यानंतर त्या तरुणाने पोलिस कर्मचाऱ्यासोबतच हुज्जत घालत तेथून निघून जाण्याचा प्रयत्न केल्याने त्या तरुणाविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खेड पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दि७ रोजी सायंकाळी ७३८ वाजता संपत मच्छिंद्र गीते (२५) हे पोलीस कर्मचारी वाहतूक नियमनासाठी भरणेनाका येथे पेट्रोल पंप जवळ कर्तव्य बजावत होते. त्याचवेळी स्वराज नंदकिशोर गुजराती (वय २६, रा. हेडगेवार कॉलनी ब्राह्मण आळी) हे त्यांचे कडील दुचाकी (एम. एच. ४३/बी.एस/७०६७) वरील विना मास्क व मोबाईल फोनवर बोलत दुचाकी चालवित आले असता पोलीस कर्मचारी श्री. गीते यांनी त्यांना मोटार वाहन कायद्याप्रमाणे कायदेशिर कारवाई करण्यासाठी त्यांच्याकडे त्यांचे ड्रायव्हिंग लायसन्सची मागणी केली असता, स्वराज याने त्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स त्यांना दाखवण्यास नकार देवून हातवारे करुन, जोरजोरात आरडाओरड करुन श्री. गीते यांना धक्का देऊन, चोर आहेस तू, असे म्हणून दमदाटी केली व श्री. गीते यांनी थांबवलेली दुचाकी जबरदस्तीने तेथून ते घेऊन जाऊ लागले. स्वराज याने अशा प्रकारचे वर्तन करुन शासकीय कामात अडथळा आणून श्री. गीते यांना कर्तव्यापासून धाकाने परावृत्त केले तसेच लोकांच्या जीवितास धोकादायक असलेल्या कोव्हिड-१९ या विषाणूचा संसर्ग पसरण्याचा संभव असून आरोपी याला माहिती असून देखील ते हयगयीने विनामास्क सार्वजनिक ठिकाणी दुचाकीवरुन आले म्हणून, खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:45 PM 10-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here