कोरोनाचा फटका शेअर बाजाराला ; निर्देशांक १ हजार अंशांनी घसरला

0

मुंबई : शेअर बाजार खुला होतानाच सेन्सेक्स निर्देशांक तब्बल एक हजार अंशांनी घसरला आहे. सध्या निर्देशांक ३८ हजारावर पोहोचला आहे. तर, निफ्टीमध्येही ३१२ अंशांची घसरून होऊन निर्देशांक ११ हजारावर स्थिरावला आहे. टाटा स्टील, टाटा महिंद्रा, बजाज फायनान्स, इन्फोसिस, महिंद्रा अँड महिंद्रा आणि ओएनजीसीच्या शेअर्समध्ये ५.३१ टक्क्यांची घसरण झाली. जगभरात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातील शेअर बाजारांमध्ये मंदीचे वातावरण आहे. शुक्रवारी विक्रीचे सत्र सुरू राहिल्यामुळे सकाळी शेअर बाजार उघडताच १,०८३.८५ अंशांनी घसरून ३८,६६१.८१ पोहोचला. तर, निफ्टी ३१२ अंशांनी घसरून ११,३२१.३० वर पोहोचला. तसेच रुपयामध्येही ३३ पैशांची घसरण झाली आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये गुंतवणूकदारांचे तब्बल पाच लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here