अभिनेता जितेंद्र जोशीला कोरोनाची लागण

0

मुंबई : मागील दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. आतापर्यंत सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लसीचे दोन डोस घेऊन योग्य ती काळजी घेतल्यानंतरही अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. दरम्यान आता समजते आहे की, अभिनेता जितेंद्र जोशीला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने ही माहिती इंस्टाग्रामवर दिली आहे.

जितेंद्र जोशीने कोरोनाची घरी टेस्ट केली, जी पॉझिटिव्ह आली आहे. त्याने फोटो शेअर करत लिहिले की, कोरोनाने मला निवडले. अत्यंत त्रासदायक आणि “ताप”दायक अनुभव आहे. ताप तर आहेच शिवाय डोकेदुखी, अंगदुखी आणि सर्व लक्षणे!! माझ्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घ्यावी ही विनंती. माझे RTPCR रिपोर्ट्स लवकरच मिळतील. वैद्यकीय उपचार सुरू आहेत. नेमका कुठला कोरोना आहे ते RTPCR रिपोर्ट आल्यावर कळेल.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:14 PM 11-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here