लांजा येथील यूथ ऑर्गनायझेशनतर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

लांजा : लांजा येथील यूथ वेल्फेअर ऑर्गनायझेशनतर्फे शहरातील महात्मा बसवेश्वर सदन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यूथ वेल्फेअर ऑर्गनायझेशन संस्थेचे रक्तदान शिबिराचे हे दुसरे वर्ष असून ही संस्था नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबवत असते. यावर्षीही सामाजिक भावनेतून आयोजित केलेले रक्तदान शिबिराला रक्तदात्यानी सहभाग घेऊन भरघोस प्रतिसाद दिला.

रक्तदानाची आजची गरज ओळखन संस्थेने यावर्षीही हा उपक्रम नकताच पार पाडला. विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. हीच गरज ओळखून यूथ वेल्फेअर ऑर्गनायझेशनतर्फे रक्तदान शिबिराचा उपक्रम राबविला.

दि. ५ जानेवारी रोजी लांजा शहरातील भाईशेटेवाडी येथील महात्मा बसवेश्वर सदन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला रक्तदात्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. विशेषतः महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवगंध प्रतिष्ठानचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते राजू जाधव, यूथ वेल्फेअर संस्थेचे अध्यक्ष नदीम काझी, उपाध्यक्ष अल्ताफ शेख, कार्याध्यक्ष शमिम नाईक, उपकार्याध्यक्ष रिझवान खतीब, सेक्रेटरी फारुख मोटलाणी, सहसचिव जावेद नाईक, खजिनदार इकबाल खतीब, याकुब पाटणकर, मोसीन नाईक, आरबाज नेवरेकर, रऊफ नेवरेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी एनसीडी जिल्हा रुग्णालयचे कमर्चारी तसेच वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष मोहन तोडकरी, प्रसाद भाईशेट्ये, सुरु लाड, बशीर मुजावर, शरीफ लांजेकर, वसिम मुजावर आदी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:22 PM 11-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here