देशभरात 24 तासातील नव्या कोरोना बाधितांचा आकडा दोन लाखांच्या जवळ

0

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. देशातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा सुमारे दोन लाखांच्या जवळ पोहोचला आहे. देशात गेल्या 24 तासात 1 लाख 94 हजार 720 नवे कोरोनारुग्ण आढळले असून 442 जणांचा मृत्यू झाला आहे.

देशात सध्या 9 लाख 55 हजार 319 सक्रीय रुग्ण आहेत. सध्याचा कोरोना रुग्ण वाढीचा दर 11.05 टक्के इतका आहे. शिवाय, देशातील ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्गही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भारतातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या 4 हजार 868 वर पोहोचली आहे.

कोरोना महामारीमुळे देशात आतापर्यंत एकूण 4 लाख 84 हजार 655 जणांनी आपला जीव गमावला आहे. कोरोनाच्या या वेगात लसीकरण मोहीम मोठ्या उत्साहात सुरू आहे. आतापर्यंत 153 कोटींहून अधिक लसीकरण करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:59 AM 12-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here