कोरोना व्हायरसची भीती घालवण्यासाठी कोल्हापुरात अनोखा कार्यक्रम

0

कोरोना व्हायरसच्या अफवेमुळे चिकन पोल्ट्री व्यवसायावर परिणाम झाल्याने कोल्हापुरात एका चिकन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या चिकन महोत्सवात लोकांना खास चिकनपासून बनणाऱ्या पदार्थांची चव चाखता येणार आहे. कोल्हापूर जिल्हा ब्रॉयलर, ब्रीडर वेल्फेअर असोसिएशन, पोल्ट्री फार्मधारक शेतकरी, उद्योजक, कर्मचारी यांनी हा महोत्सव आयोजित केला आहे. अशा महोत्सवाच्या माध्यमातून चिकन बाबतीत गैरसमज दूर व्हावेत हा हेतू असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे लोकांमध्ये असलेला गैरसमज दूर होऊन चिकनच्या मागणीत वाढ होईल तसंच हा व्यवसाय पूर्ववत होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here