शहरातील टपऱ्या हटवण्याबाबत बीजेपी नगरसेवकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

0

▪ नगराध्यक्षांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी शहर बकाल करण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या टपऱ्यांच्या विरोधात बीजेपी नगरसेवक आक्रमक झाले आहेत. याबात गटनेते समीर तिवरेकर यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे. या टपऱ्यांवर होणारे व्यवहार अवैध गोष्टीना चालना देणारे आहेत. शहरात कुठेही फळविक्रेते उभे असतात त्यामुळे रहदारीला अडथळा होतो. टपऱ्यांचे साम्राज्य हे शहराच्या सौंदर्यावर अनिष्ठ परिणाम करत आहे. बेरोजगारीचा मुद्दा पुढे करून या टपऱ्यांना अभय द्यावे असा मुद्दा पुढे येऊ शकतो मात्र जे अवैध आहे ते थांबलेच पाहिजे अशी भूमिका बीजेपी नगरसेवकांनी घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here