सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी कोरोना पॉझिटिव्ह

0

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचा रॅपिड टेस्ट कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

त्यानंतर त्यांनी स्वतःला होम आयसोलेशन करून घेत वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत. प्रतिकार शक्ती वाढवणारे कॉकटेल इंजेक्शन त्यांना देण्यात आले आहे. आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी गेली दोन वर्षे कोरोना नियंत्रणासाठी मेहनत घेत आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी साथ नियंत्रणासाठी काम केले आहे. अशातच त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवताच त्यांनी रॅपीड टेस्ट करून घेतली. यामध्ये त्यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे प्रशासकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:52 PM 12-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here