तोल जाऊन खाली पडला ; बसच्या चाकाखाली सापडला; अनर्थ झाला !

0

रत्नागिरी शहराजवळील सोलकरवाडी-केळ्ये येथील तरुण एसटीतून पडला. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. राजेश विजय रायकर (वय २४, रा. सोलकरवाडी-केळ्ये, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २७) ला सकाळी साडेआठच्या सुमारास लक्ष्मीनगर बसस्टॉप येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार राजेश सकाळी साडेआठच्या सुमारास कामावर जाण्यासाठी मजगांव-विश्वेश्वर शहर वाहतूक बसमधून (क्र. एमएच२० बीएल १४८९) निघाला होता. सकाळी साडेआठच्या सुमारास बस लक्ष्मीनगर बस स्टॉप येथे बसचा वेग कमी करत असताना राजेश बसमधून उतरत असताना त्याचा तोल जाऊन तो चाकाखाली गेला. बसचे पुढील डाव्या बाजूचे चाक त्यांच्या अंगावरून गेले. त्याला गंभीर दुखापत झाली. तत्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here