संक्रांतीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची लगबग

0

रत्नागिरी : हिंदू धर्मातील वर्षातील पहिल्या मकर संक्रांतीच्या सणाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. शुक्रवार, दि. १४ जानेवारी रोजी सर्वत्र मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मारुती मंदिर, गोखले नाका, धनजी नाका या भागात सुगड विक्रेत्यांनी आपली छोटी दुकाने थाटली आहेत.

सूर्याच्या मकर संक्रमणावर आधारलेला भारतीय सण म्हणजे मकर संक्रांती. या दिवशी सूर्याच्या उत्तरायणाला प्रारंभ होतो. मकर संक्रांतीनेच ऋतू परिवर्तन होते. शरद ऋतू क्षीण होतो आणि वसंत ऋतूचे आगमन सुरू होते. याच्या फळ स्वरूप दिवस मोठे होतात आणि रात्र छोटी होते.

संक्रांतीसाठी छोट्या व्यावसायिकांनी गेल्या आठवड्यापासून दुकानांची मांडणी केली आहे. संक्रांतीसाठी महिलांची पावले बाजाराकडे वळली असून, बाजारपेठेत सुगड व अन्य साहित्यांच्या खरेदीसाठी महिलांची गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी सकाळपासूनच बाजारपेठेत गर्दी होण्यास सुरुवात झाली होती. बाजारपेठेत संक्रांतीच्या वाणासाठी लागणारे साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्यात आले आहे. या

मकर संक्रांतीला तीळ आणि गुळाचे लाडू आणि घराघरांत पुरण-पोळी बनवण्याची परंपरा आहे. तिळगुळाच्या सेवनाने थंडीच्या दिवसात शरीराला ऊब मिळते आणि हे आरोग्यासाठी उत्तम असते. तिळगुळ देऊन हा सण साजरा केला जातो. गतवर्षी तिळगुळाची किंमत १२० रुपये किलो होती. यंदा त्यामध्ये २० ते ३० रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच तिळाच्या लाडवांचा दर २५० रुपये प्रतिकिलो होता. यंदा तो कायम आहे. तिळगुळाची पोळी २५ रुपये एक नग या दराने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अनेक गृहिणींना याद्वारे रोजगार उपलब्ध होत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:06 AM 13-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here