नाणार रिफायनरीला विरोध करणाऱ्या शिवसेनेला आणखी एक धक्का!

0

रत्नागिरी: नाणार प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शिवसेनेला धक्का देत स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नाणारला पाठिंबा दिला आहे. नाणार रिफायनरी समर्थकांकडून निमंत्रण आल्यास आम्ही जाणार असं स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यावर काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीच्या रत्नागिरी तालुका विभागाने नाणार रिफायनरी प्रकल्पाला पाठिंबा जाहीर केला आहे. नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध आहे. काही शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी पाठिंबा देण्याची तयारी केली होती. नाणार प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्या नेत्यांची शिवसेनेकडून पदावरुन उचलबांगडी करण्यात आली होती. राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यामधून कसा मार्ग काढणार पहावे लागेल. दरम्यान, स्वतःच्या मतदारसंघात रोजगार आणू न शकलेले आता दुसऱ्याच्या मतदारसंघात लुडबूड कशाला करत आहेत? अशी टीका स्थानिक राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांकडून शिवसेना नेते आणि उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यावर करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी सरकार आलं असलं तरी स्थानिक पातळीवर मतभेद दिसून येत आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here