फडणवीसांविरोधात जळगावात शिवसैनिकांकडून ‘टरबूज फोडो’

0

मुंबईतील आझाद मैदानावर एका आंदोलनच्या वेळी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेने बांगड्या भरल्या आहेत’असे वक्तव्य केले होते. फडणवीसांच्या या वक्तव्याविरोधात जळगाव महानगर शिवसेनेतर्फे निषेध करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून टरबूज फोडो आंदोलन केले. जळगाव येथील टॉवर चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी फडणवीसांच्या विरोधात घोषणाही दिल्या. शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, नगरसेवक विष्णू भंगाळे, महिला आघाडीच्या शोभा चौधरी आदींची उपस्थिती होती.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here