कोरोनाचा जिल्हा परिषद भवनालाही फटका: कर्मचारी बाधित, जि.प.चा एक गेट बंद

0

रत्नागिरी : जिल्ह्यात सध्या कोरोना संख्या वाढत आहे. याचा फटका जिल्हा परिषद भवनालाही बसला आहे. एका विभागातील चार कर्मचारी बाधित सापडल्याने प्रशासन अॅलर्ट झाले आहे. एक दरवाजा बंद करण्यात आला असून, भवनात येणाऱ्या प्रत्येकाची थर्मल स्क्रीनिंग तसेच अभ्यागतांना प्रवेश देताना मर्यादा ठेवण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात आठवडाभरापासून रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्याचबरोबर ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, विविध उपक्रम राबवले जात आहेत. लसीकरणाचा वेगही वाढवण्यात आला आहे. शासनाने शासकीय कार्यालयात अनेक निर्बंध केले आहेत. यामध्ये कर्मचाऱ्यांची ५० टक्के उपस्थिती ठेवण्यात येणार आहे.

या कोरोनाचा फटका जि. प. भवनालाही बसला आहे. शिक्षण विभागातील दोन दिवसांपूर्वी चार रुग्ण सापडल्याने भवनात एकच खळबळ उडाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जि. प.चा एक गेट बंद करत येणाऱ्या अभ्यागतांवर मर्यादा ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्येकाचे थर्मल स्क्रिनिंग केले जात आहे.

महत्त्वाचे काम असेल तरच त्यांना आतमध्ये घेतले जात आहे. टपाल असेल तर प्रवेशद्वाराजवळ स्वीकारले जात आहे. तिथे कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED

(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:09 PM 13-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here