जागतिक बोलीभाषा वर्षाच्या निमित्ताने कोकणातील बोलीभाषा कथा स्पर्धा रत्नागिरीत आयोजित केली होती. पालघरपासून गोव्यापर्यंतच्या कोकणातील विविध बोलीभाषांमधून लेखन करणाऱ्या स्पर्धकांनी त्यात सहभाग घेतला होता. त्यातील यशस्वी स्पर्धकांच्या बक्षिसांचे वितरण शनिवारी २९ फेब्रुवारीला रत्नागिरीत शिवाजीनगर येथील श्री हॉलमध्ये (नाना खोत संकुल) सायंकाळी साडेचार वाजता होणार आहे. या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या निमित्ताने संगमेश्वरी आणि मालवणी या दोन बोलीभाषांमधील गजाली आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यानिमित्ताने संगमेश्वरी बोलीतून लेखन करणारे गिरीश बोंद्रे आणि मालवणीतून दर्जेदार कविता सादर करणारे दादा मडकईकर यांच्या गजालींचा म्हणजेच अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
