”दुकानावर मराठीत पाट्या लावून काय होईल, मराठी शाळांना वाचवा”

0

मुंबई : राज्य सरकारने राज्यातील सर्वच दुकानदारांना दुकानाचे नाव मराठी अक्षरानेच, म्हणजे मराठी पाट्या लावण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. त्यावरुन, आता राजकारण होताना दिसत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या निर्णयाबाबत सरकारचे अभिनंदन केलं आहे. मात्र, या निर्णयाचे श्रेय केवळ मनसेचं असल्याचं म्हटलं आहे. तर, काही व्यापाऱ्यांना यास विरोधही केला आहे. आता, मराठमोळा अभिनेता सुमीत राघवनने या निर्णयासंदर्भात एक पोस्ट केली आहे.

सुमीत राघवनने सोशल मीडियावर विविध विषयावर मत मांडत असतो. आता, राज्य सरकारने मराठी पाट्यांसदर्भात घेतलेल्या निर्णयावर त्याने एक व्हिडिओ शेअर करत आपले विचार व्यक्त केले आहेत. ”याने खरंच काही मदत होणार आहे का? तर नाही. मराठी वाचवायची असेल तर मराठी शाळा वाचवा, मराठी पालकांना आपल्या मुलाला मराठी शाळेत दाखल करण्यासाठी प्रोत्साहित करा. सर्व मराठी शाळा इंग्रजी माध्यमात बदलत आहेत. सरकारचा हा निर्णय बॉम्बेचं मुंबई करण्यासारखा आहे, कृपा करून मोठा विचार करा. दुकानांची नावं मराठीत लिहून काय होणार?”… असं त्याने म्हटलं आहे.

बुधवारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाविकास आघाडी सरकारनं १० पेक्षा कमी कामगार असलेल्या दुकानांच्या आणि आस्थापनाच्या पाट्या मराठीत असणं बंधनकारक आहे असा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काही अमराठी व्यापाऱ्यांनी या निर्णयाला विरोधही केला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:29 PM 14-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here