चिपळूणच्या स्वप्निल शिंदेची राष्ट्रीय स्तरावर कबड्डी स्पर्धेसाठी निवड

0

महाराष्ट्र राज्याच्या कबड्डी संघात दसपटी विभागातील पेढांबेगावचा सुपुत्र स्वप्निल शिंदे याची निवड झाली आहे. जयपूर येथे होणाऱ्या ६७ व्या राष्ट्रीय पुरुष कबड्डी स्पर्धेसाठी तो राज्याच्या कबड्डी संघातून खेळणार आहे. महाराष्ट्राचा संघ ६७ व्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहे. स्वप्निल शिंदे हा खेळाडू मैदान गाजवित आहे. जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तरावरील तसेच प्रो कबड्डीचे मैदानही त्याने गाजविले आहे. त्याची निवड झाल्याबद्दल आ. शेखर निकम, प्रताप शिंदे, सचिन कदम, बाबू तांबे, माजी आ. रमेश कदम यांनी अभिनंदन केले आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here