दिल्ली हिंसाचाराचा कळस; गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्याला भोकसले तब्बल ४ ते ६ तास

0

CAA चा विरोध करणारे आणि समर्थन करणारे यांच्यात दिल्लीमध्ये हिंसक झडप झाली. या झडपेनंतर हिंसाचाराचा आगडोंब उसळला असून यामध्ये आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू झाला आहे. हिंसक जमावाने ज्यांना ठार मारलं त्यामध्ये गुप्तचर विभागाचे अधिकारी अंकीत शर्मा यांचाही समावेश होता. शर्मा यांच्या पोस्टमॉर्टेमचा अहवाल प्राप्त झाला असून यामध्ये त्यांना अगणित वेळा भोसकल्याचं कळालं आहे. अंकीत शर्मा यांच्या पॉस्टमॉर्टेम रिपोर्टमुळे धक्कादायक गोष्टींचा उलगडा झाला आहे. छातीवर आणि पोटावर ज्या पद्धतीने वार करण्यात आले आहेत ते पाहता अंकीत शर्मा यांचा मृत्यू हा अत्यंत वेदनादायी पद्धतीने झाला असावा हे सहजपणे कळतं आहे. अहवालानुसार अंकीत शर्मा यांना 4 ते 6 तास भोसकण्यात आले होते अशीही बाब या पोस्टमॉर्टेमद्वारे उघड झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here