टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा निर्धारित वेळापत्रकानुसार होईल – केंद्रीय क्रीडामंत्री

0

‘कोरोना संक्रमणाची जगभरात दहशत असल्यामुळे चिंता कायम आहे. तरीही यंदा टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन निर्धारित वेळापत्रकानुसार होईल,’ असा विश्वास केंद्रीय क्रीडामंत्री कीरेन रिजिजू यांनी व्यक्त केला आहे. ऑलिम्पिकचे आयोजन २४ जुलैपासून टोकियो शहरात होणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे ज्येष्ठ सदस्य डिक पाऊंड यांनी बुधवारी भीती व्यक्त करताना, ‘कोरोनावर मे पर्यंत प्रतिबंध घालण्यात अपयश आल्यास ऑलिम्पिक रद्द करावे लागेल,’ असे वक्तव्य केले होते. रिजिजू यांनी येथे भारतीय खेळाडूंसाठी आयोजित जपानी संस्कृती आणि शिष्टाचाराच्या जागृततेसाठी आयोजित कार्यशाळेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, ‘व्हायरस चीनमध्ये आहे, टोकियोत नाही.’ संकटाचा सामना करण्यास भारताने एकजूट दाखवावी, ही काळाची गरज आहे. मला तर टोकियो ऑलिम्पिक २४ जुलै रोजी ठरल्यानुसार सुरू होण्याची आशा आहे. विश्व एका समुदायासारखे असल्यामुळे आपल्याला एक मेकांना पाठिंबा द्यायलाच हवा.’ कोरोनाने चीनमध्ये आतापर्यंत २७०० हून अधिक बळी घेतले आहेत. जपानमध्ये १८० हून अधिक लोकांना संक्रमणाची लागण झाली असून त्यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. आॅलिम्पिकला कोरोनाचा कुठलाही धोका नसल्याचा पुनरुच्चार टोकियो आयोजन समितीने केला आहे. भारतीय संघाच्या ऑलिम्पिक तयारीसंदर्भात विचारताच रिजिजू म्हणाले, ‘२०१६ च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान खेळाडूंच्या सामनासंदर्भात झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही, याची खबरदारी घेण्यात येणार आहे. २०१६ साली व्यवस्थापन करण्यासंदर्भात काही उणिवा चव्हाट्यावर आल्या होत्या, मात्र पुन्हा ही चूक होणार नाही, याकडे गांभिर्याने लक्ष दिले जात आहे.’

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here