महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या बंगल्यांना गड-किल्यांची नावं, आदित्य ठाकरेंच्या बंगल्याचं नाव ‘रायगड’

0

मुंबई : राज्यातील दुकानांवर आता मराठी भाषेत नामफलक लावण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाल्यानंतर आता मंत्र्यांच्या बंगल्यांचीही नावंही बदलली आहेत. मंत्र्यांच्या बंगल्यांना गडकिल्ल्यांची नावं देण्यात आली आहेत.

आतापर्यंत या बंगल्यांना केवळ क्रमांक दिले होते आणि त्यावरून बंगल्यांची ओळख व्हायची मात्र आता हे बंगले गड किल्ल्यांच्या नावांनी ओळखले जाणार आहेत.

मंत्री उदय सामंत यांचा बंगला आता रत्नसिंधू नावाने ओळखला जाणार आहे. तर मंत्री आदित्य ठाकरे यांच्या बंगल्याला रायगड नाव देण्यात आलंय. राज्यभरातील शिवप्रेमींनी यासाठी सतत पाठपुरवठा केला होता. त्यांनी या संदर्भात उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे प्रस्ताव दिला होता. मंत्री उदय सामंत यांनी या प्रस्तावावर सकारात्मक पाठपुरवठा केला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंजुरीनंतर अखेर मंत्र्यांच्या शासकीय निवास्थानांचं नामांतर करण्यात आलंय.

मंत्र्यांच्या बंगल्यांना गडकिल्ल्यांची नावं
अ-3- शिवगड- जितेंद्र आव्हाड
अ-4- राजगड- दादा भुसे
अ-5- प्रतापगड- के.सी.पाडवी
अ-6- रायगड- आदित्य ठाकरे
बी-1- सिंहगड- विजय वडेट्टीवार
बी-2- रत्नसिंधु- उदय सामंत
बी-3-जंजिरा- अमित देशमुख
बी-4-पावनगड- वर्षा गायकवाड
बी-5- विजयदुर्ग- हसन मुश्रीफ
क-5- अजिंक्यतारा- अनिल परब
क-6- प्रचितगड- बाळासाहेब पाटील

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:59 AM 15-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here