अभिनेता किरण माने यांना सीरियलमधून भाजपमुळे काढले, हे आरोप बिनबुडाचे : प्रविण दरेकर

0

मुंबई : अभिनेता किरण माने यांना स्टार प्रवाहच्या एका सीरियलमधून भाजपमुळे काढले, हे आरोप बिनबुडाचे आहेत. कारण स्टार प्रवाहने कोणाला काढावे, कोणाला ठेवावे हा त्यांचा विषय आहे. सरकार चालवण्यासाठी आलेले अपयश झाकण्यासाठी अशा प्रकारचे किरकोळ विषय पुढे आणले जातात, असे स्पष्टीकरण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिले.

अभिनेता किरण माने भाजपविरुद्ध बोलल्यामुळे त्यांना स्टार प्रवाहच्या सिरियलमधून काढून टाकण्यात आले, असा आरोप करण्यात येत आहे, त्याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना दरेकर पुढे म्हणाले की, भाजप त्यांचा प्रोड्यूसर, डायरेक्टर नाही. भाजपमुळे ही कारवाई झाली याचा कुठलाही पुरावा नसताना असे बिनबुडाचे बोलणे योग्य नव्हे. राजकारण करून भाजपला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही दरेकर म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:43 AM 15-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here