असं असेल तर आयपीएल खेळू नका – कपील देव

0

न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाने एक दिवसीय मालिका गमावल्यानंतर कसोटी मालिकेची सुरुवात देखील दारुण पराभवाने झाली. एक दिवसीय सामन्यांपासून इंडियाच्या फलंदाजांची कामगिरी अत्यंत सुमार होत चालली आहे. त्यामुळे त्यांच्यावर चोहोबाजूने टीकेची झोड उठत आहे. टीम इंडियाची दयनीय अवस्था पाहून माजी कर्णधार कपिल देव देखील भडकले असून त्यांनी खेळाडूंना खडे बोल सुनावले आहेत. जर खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेड्यूल फार व्यग्र वाटत असेल किंवा दगदग होत असेल तर त्यांनी आयपीएल खेळू नये, असे मत कपील देव यांनी व्यक्त केले आहे. अति क्रिकेट होत आहे असे तुम्हाला वाटत असेल तर आयपीएल खेळू नका. आयपीएल मध्ये तुम्ही देशासाठी खेळत नसता. त्यामुळे तुमची दगदग होत असेल तर आयपीएलच्या काळात ब्रेक घेण्यास हरकत नाही. तुम्ही जेव्हा देशासाठी खेळत असता तेव्हा वेगळी भावना असते, असे कपील म्हणाले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here