एसटी कर्मचाऱ्यांना भाजपतर्फे रत्नागिरीत अन्नधान्य किट वाटप

0

रत्नागिरी : एसटी कर्मचाऱ्यांचे दुखवटा आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सहभागी कर्मचारी गेले दोन महिने पगारापासून वंचित आहेत. परजिल्ह्यातील अनेक कर्मचारी भाडेतत्त्वावर रूम घेऊन राहत आहेत.

अशा अनेकांची खाण्यापिण्याची आबाळ होऊ नये, त्यांना आधार म्हणून खारीचा वाटा उचलावा, म्हणून भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, प्रमोद खेडेकर यांच्या प्रयत्नाने अन्नधान्य किट वाटप करण्यात आले.

यावेळी सचिन वहाळकर, सचिन करमरकर, संदीप सुर्वे, योगेश हळदवणेकर, राजन पटवर्धन यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:16 AM 17-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here