दापोली-पनवेल एसटी बसवर दगडफेक

0

दापोली : तालुक्यातील महाळुगे अंगणवाडी येथे दापोली-पनवेल या एसटी बसवर दि. १४ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दगडफेक झाल्याची घटना घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एसटी बस चालक नरेश पांडुरंग कांबळे (वय ३७, रा. दापोली-पनवेल एसटी बस. दापोली) हे दापोलीतून पनवेलला बस घेऊन निघाले होते. त्यानंतर ते पनवेलवरून पुन्हा दापोलीकडे प्रवासी घेऊन रवाना झाले. ही बस महाळुगे गवाणे येथे आली असता, रस्त्याच्या उजव्या बाजूला उभ्या असलेल्या एका अज्ञात व्यक्तीने त्याच्या हातातील दगड बसच्या दर्शनी काचेवर मारला.

या घटनेत एसटीचे १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी नरेश कांबळे यांनी दापोली पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानुसार भा. दं. वि. कलम ४२७ नुसार सार्वजनिक संपत्तीचे नुकसान प्रतिबंध अधिनियम १९८४ कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:52 AM 17-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here