शौचालयाच्या टाकीत पडून महिलेचा मृत्यू

0

गुहागर : गुहागर वरवेली आगरेवाडी येथे एक ४२ वर्षीय महिलेचा तोल जाऊन शौचालयाच्या टाकीत पडून मृत्यू झाला.
मनाली विजय भागडे (वय ४२, मूळ राहणार वहाळ ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. रविंद्र रामचंद्र आगरे वय ४६, रा. वरवेली ता. गुहागर यांनी गुहागर पोलीस ठाण्यात याची खबर दिली आहे.

वहाळ हे सासर असुन वरवेली येथे ती महिला आपल्या माहेरी आली होती. त्यावेळी ही घटना घडली आहे. हा प्रकार दि. १५ जानेवारी रोजी संध्याकाळी ५ च्या सुमारास घडला आहे.

वरवेली आगरेवाडी येथील आपल्या माहेरी घराच्या मागील बाजूस संडासच्या टाकीवर कचरा काढीत असताना शौचालयाच्या टाकीचा कडप्पा तुटल्याने ती टाकीत पडली. तिच्या डोक्याला दुखापत होऊन, नाकातून रक्तस्राव झाला. यावेळी माहेरच्या मंडळींनी तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र गंभीर दुखापत झाल्याने यातच त्या महिलेचा मृत्यू झाला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:46 PM 17-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here