वीज बिल न भरल्याने सुरळ आरोग्य उपकेंद्राचा वीजपुरवठा खंडित

0

गुहागर : तालुक्यातील आवलोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत असलेल्या सुरळ उपकेंद्रातील वीज पुरवठा वीज बिल न भरल्याने खंडित करण्यात आला आहे. वीज पुरवठा खंडित करून, वीज मीटर काढण्याची प्रक्रिया महावितरणकडून लवकरच होणार आहे.

गेली दहा महिने अंधारात आरोग्य सेविका व अन्य कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे. याकडे आरोग्य विभाग डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. सुरळ उपकेंद्रात पांगारी, पाली मढाळ, सुरळ गावे समाविष्ट आहेत. कोरोना लसीकरण करताना वीज पुरवठा नसल्याने लसीकरण करताना अडथळा निर्माण होत आहे.

लसीकरणासाठी चार गावातून येणाऱ्या नागरिकांची वीज पुरवठाअभावी हाल होत आहेत. या उपकेंद्रात दोन मीटर होते. एका मीटर चा बिल आबलोली आरोग्य केंद्र भरत असे त्याचबरोबर दसऱ्या मीटरचे बिल तिथे सेवा करणाऱ्या आरोग्य सेविका भरत असे. आता याठिकाणी आरोग्य सेविका पद रिक्त आहे. त्यामुळे हेही बिल भरलेले नाही. तसेच आरोग्य उपकेंद्राचे वीज बिल आरोग्य विभागाने भरले नसल्याने महावितरणवर वीज पुरवठा खंडित करण्याची वेळ आली. वीज पुरवठा खंडित करण्याची ही दुसरी घटना आहे. तरी आरोग्य विभागाकडून तत्काळ वीज पुरवठा सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन नागरिक करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:52 PM 17-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here